4 comments

इतकी नाजुक....!


इतकी नाजुक इतकी अल्लड, फुलपाखाराहून हळवार,
चालू बघता नकळत होते वार्या वरती  अलगद स्वार,...........इतकी नाजुक ……. ||

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार,
लक्ख गोरटी रापून जाली रात्रीत एका सावळनार,...............इतकी नाजुक ……. ||

इतकी नाजुक........जरा निफेनी जोर देऊनी  लिहिता नाव,
गालीत आली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव,.........इतकी नाजुक ……. ||

इतकी नाजुक, इतकी सुन्दर, दर्पण देखिल खुलावातो,
ती गेल्यावरती, तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो,........ इतकी नाजुक …….||

इतकी नाजुक की, जेव्हा ती पावसात जाऊ बघते,
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते,………इतकी नाजुक …….|| 

इतकी नाजुक की, आता तर स्मरणाचे भय वाटे,
नको रुताया फुलास असल्या माझ्या जीवनातील काटे …....इतकी नाजुक …….||


                                                                                                      - संदीप खरे
No comment yet

Beauty of Maharashtra





No comment yet

आज तुझी खुप आठवन येतेय ..........

आई, आज तुझी खुप आठवन येतेय ..........

दोन दिवसां पासून डोकं खुप दुखतय...........
रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेउन झोपताना,
तु केलेल्या चम्पी ची खुप आठवन येतेय ..........

आज माझा Result ATKT लागलाय...........
पेपर अवघड गेल्यावर एकटाच बसलेलो असताना,
तु काढलेल्या समजुतीची खुप आठवन येतेय ..........

Room मधे एकटाच बसलो आहे.........
तुझ्या कुशीत शीरून रडताना,
तुझ्या डोक्या वरून फीरनाऱ्या हाताची खुप आठवन येतेय ..........

मेस ची रोजचीच आमटी खातोय..........
खास माझ्या साठी तु मेथीची भाजी केलेली असताना,
दर वेळी दुस्र्याच भाजीचा हट्ट केल्याची खुप आठवन येतेय ..........

कंपनीत जाउन रोज वड़ापाव खातोय..........
साधा क्लासला जरी चाललो असताना,
तु डब्यात दिलेल्या भाजी अणि पोळीची खुप आठवन येतेय ..........

गेले ८ दिवस तेच तेच कपडे वापरतोय........
फक्त दोन तास शर्ट घातलेला असताना,
तु धुवून इस्त्री करून ठेवलेल्या शर्टची खुप आठवन येतेय ..........

हे सर्व रात्री २ वाजता लिहीत असताना,
रात्री तु अंगावर घातलेल्या पांघरुनाची खुप आठवन येतेय ..........