शंभूराजे आम्हाला माफ करा.


(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून) शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही. पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय. त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो. ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो. ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला. आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना. इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली. अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....

Post a Comment